मुंबई : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झालेला आहे. चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे. मुंबईवर महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचे आता जवळजवळ स्पष्ट आलेले. आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, धुळे यासारख्या बहुसंख्य महापालिकांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. विरोधी बाकावर असलेल्या महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना मात्र अनेक ठिकाणी जबर हादरे बसले आहेत. असे असतानाच अहिल्यानगरातील निकालाची राज्यभरात चर्चा होत आहे. कारण इथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खातंदेखील खोलता आलेलं नाही. अजित पवार यांच्या पक्षाने मात्र जोरदार मुसंडी मारलेली आहे.
अहिल्यानगरात नेमका निकाल काय? कोण विजयी?
अहिल्यानगरात भजपाला एकूम 25 जागा मिळाल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळालेली नाही. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मात्र एकूण 27 जागांवर विजय मिळवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचाही दहा जागांवर विजय झाला आहे. तर ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला फक्त एकच जागा मिळाली आहे. काँग्रेसच्या दोन उमेदवारांचाही येथे विजय झालेला असून मनसेला खातं खोलता आलेलं नाही. दुसरीकडे बसपाला एक जागा मिळाली आहे. तर एमआयएम पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत.
भाजपा आणि शिंदे यांची शिवसेनाच वरचढ
दरम्यान, अहिल्यनगराची महापालिका जिंकण्यासाठी इथे सर्वच पक्षांनी जोर लावला होता. परंतु इथे भाजपाने मुसंडी मारली आहे. ठाकरे यांना तसेच शरद पवार यांच्या पक्षाला अनुक्रमे एक आणि शून्य जागा मिळालेली असल्याने ही धक्कादायक बाब मानली जात आहे. दुसरीकडे मुंबई, छत्रपती संभाजीनगरातही भाजपा आणि शिंदे यांची शिवसेनाच वरचढ ठरली आहे. यासह इतरही अनेक महापालिकांत भाजपाचीच सरशी दिसत असल्याने आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विरोधकांना आपली रणनीती बदलावी लागणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. विरोधकांना आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणखी जोर लावावा लागणार आहे.















